पंढरपूर यात्रेसाठी एस.टीच्या जादा गाडय़ा Print

ठाणे / प्रतिनिधी
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एस. टी. महामंडळातर्फे मंगळवार २० नोव्हेंबर पासून जादा गाडय़ा सोडण्यात येतील. एस.टी.च्या विविध स्थानकांवरून या गाडय़ा सोडल्या जाणार आहेत. ठाणे, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड व बोरिवली नॅन्सी कॉलनी येथून या जादा गाडय़ा सोडण्यात येतील.