संक्षिप्त Print

गुणवंतांचा सत्कार
डोंबिवली :
रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीतर्फे रविवार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता रघुवीरनगरमधील रोटरी सेवा केंद्राच्या सभागृहात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या वक्तींना ‘व्यावसायिक गुणवत्ता श्रेष्ठता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. उद्योजक गजाननराव पेंढरकर, अध्यक्ष शंकर साठवणे या वेळी उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क - ९८२१९३८६१८.
महिलांसाठी छंदवर्ग
ठाणे : अश्व क्रिएशनतर्फे रविवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत महिलांसाठी छंद वर्ग आयोजित करण्यात आला आहे. रांगोळी, कंदील, दिवे बनवण्यासह भरतकाम, वारली पेंटिंग, पेपर क्विलिंग यांसारख्या विविध गोष्टींचे प्रशिक्षण या वेळी देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - ९८१९६०७९६६ / ९८६७४५३७५९
आकाश कंदील कार्यशाळा
ठाणे : ‘पर्यावरण दक्षता मंच’च्या वतीने शनिवार, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता आणि रविवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वजता ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आकाश कंदील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क २५३८०६४८ / ९८६९०३३५८३
तणावमुक्ती कार्यशाळा
ठाणे : आय.पी.एच.च्या वतीने ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत तणावमुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शरीर आणि मन यांतील संबंध, विचारांचा शरीरावर होणार परिणाम, बदलणारे विचार यांसारख्या विविध गोष्टींवर या वेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - भारती सावंत - ९८७०६०००७५
डॉ. स्नेहलता देशमुख यांना दुर्गा पुरस्कार
 ठाणे: रहेजा गार्डन येथे विजया दशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अमालफी अस्कोना रहिवाशांतर्फे मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांना आरोग्य, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल ‘आधुनिक दुर्गा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. प्रा. मेधा सोमण यांच्या हस्ते देशमुख यांचा गौरव करण्यात आला. डॉ. ह. सा.भानुशाली, लक्ष्मण कदम, रंजन मलिक, दा. कृ. सोमण आणि रहेजा गार्डनमधील रहिवासी यावेळी उपस्थित होते. विविध समस्यांवर मात करण्यासाठी मन प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे असे देशमुख यांनी सांगितले. तसेच मातेच्या उदरात असलेल्या गर्भावर चहुबाजूचे परिणाम होत असतात यामुळे वातावरण कायम आनंदी आणि प्रसन्न ठेवले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. दरवर्षी असामान्य कर्तृत्व दाखविलेल्या ज्येष्ठ महिलांना ‘आधुनिक दुर्गा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
चिन्मय मिशनतर्फे व्याख्याने
डोंबिवली : चिन्मय मिशनच्या वतीने येथे स्वामिनी निश्चलानंदजी यांची प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत. १ ते ७ नोव्हें. दरम्यान सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत तुलसी रामायणावर तर २ ते ७ नोव्हें. दरम्यान सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत श्रीरमण महर्षिकृत उपदेशसार या अद्वैत ग्रंथावर ही प्रवचने चिन्मय प्रेमआश्रम, जयगुरुकृपा सोसायटी, टाटा पॉवर लाइन्स रोड, कस्तुरी प्लाझाजवळ, रामनगर, डोंबिवली येथे होतील. अधिक माहितीसाठी संपर्क-२८६१३५९.