दशकभरानंतर निर्दोष मुक्तता Print

ठाणे / प्रतिनिधी
कारची खोटी कागदपत्रे तयार करून त्याची परस्पर विक्री केल्याच्या आरोपावरून नौपाडा पोलिसांनी सुनील अमृते यांच्याविरोधात सुमारे दहा वर्षांपूर्वी गुन्हा दाखल केला होता. या खटल्याचा निकाल नुकताच ठाणे न्यायालयामध्ये लागला असून या प्रकरणातून अमृते यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच हे प्रकरण न्यायालयाने रद्दबातल ठरविले आहे.  नौपाडा येथील प्रशांतनगर परिसरात सुनील अमृते यांचे गॅरेज होते. भिवंडीत राहणारे कलीम खान हे त्यांच्या गॅरेजमध्ये कारची वातानुकूलीत यंत्रणा दुरुस्ती करण्यासाठी आले होते. त्यानंतर ते कार दुरुस्तीकसाठी गॅरेजमध्येच सोडून गेले होते. या कारची खोटी कागदपत्रे तयार करून त्याची परस्पर विक्री केल्याचा आरोप खान यांनी केला होता. तसेच या संदर्भात त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.