दीड लाखांची लाच घेणाऱ्या आयकर अधिकाऱ्यास अटक Print

ठाणे / प्रतिनिधी
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आयकर विभागातील माया चव्हाण या महिला अधिकारीस सीबीआयच्या मुंबई पथकाने दीड लाखांची लाच घेताना बुधवारी सायंकाळी पकडले आहे. सप्टेंबर महिन्यात आयकर अधिकारी माया चव्हाण यांनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या भागीदारांना कंपनीच्या स्फुटीनीची ऑर्डर निघाल्याचे सांगितले होते. तसेच ही ऑर्डर रद्द करायची असल्यास भेटण्याकरिता बोलाविले होते. त्यानंतर ऑर्डर रद्द करण्यासाठी सहा लाखांची मागणी केली होती. या प्रकरणी कंपनीच्या भागीदारांनी सीबीआयच्या मुंबई पथकाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने बुधवारी वागळे इस्टेट येथील आयकर विभागाच्या कार्यालयात सापळा रचून चव्हाण यांना दीड लाखांची लाच घेताना पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली.