‘कृतज्ञता’ काव्यसंग्रहाचे आज घाटकोपरमध्ये प्रकाशन Print

प्रतिनिधी, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२
ठाण्याच्या शारदा प्रकाशनातर्फे ज्येष्ठ कवयित्री लक्ष्मीतनया (दमयंती गोविंद मराठे) यांच्या ‘कृतज्ञता’ या काव्यसंग्रहाचे येत्या रविवार, ४ नोव्हेंबर २०१२ रोजी प्रकाशन करण्यात येणार आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेच्या लेखिका - नाटककार मनस्विनी लता रवींद्र या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या काव्यसंग्रहाला प्रवीण दवणे यांची प्रस्तावना आहे. स. गो. बर्वेनगर गणेशोत्सव मंडळ सभागृह, बर्वेनगर, घाटकोपर (पश्चिम) येथे सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने विभागातील ज्येष्ठ शिक्षक, नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी विलास गावडे हे राहणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुमेत्रा सुनील चव्हाण, नितीन परब हे करणार आहेत.