संक्षिप्त Print

‘नो फिअर कार्यशाळा’
ठाणे - सप्तश्रृंगी महिला मंडळातर्फे गुरुवार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १ यावेळेत सप्तश्रृंगी अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर, राजाराम भूवन, मंगला हायस्कूल जवळ, ठाणे (पूर्व) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नो फिअर कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - ९८३३३७६९७७
प्रदुषणविरहित दिवाळी
ठाणे - ‘जिज्ञासा ट्रस्ट’ आणि ‘नौपाडा पोलीस स्टेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६.३० यावेळेत फटाके न फोडता प्रदुषणविरहित दिवाळी साजरी करण्याच्या उद्देशाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयापासून रॅलीची सुरुवात होणार आहे. विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींना यावेळी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वर्धापनदिन साजरा
ठाणे - घंटाळी येथील सहयोग मंदिर सभागृहात अलीकडेच आयोजित करण्यात आलेला सिनिअर सिटीझन्स क्लबचा रोप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा झाला. शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह २०० जण याकार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी संस्थेच्या स्थापनेपासूनचे सभासद गोपाळ शेवडे, जया रसाळ, एकनाथ छत्रे यांचा सत्कार करण्यात आला. ‘सारेगम’मधील गायक नचिकेत देसाई आणि शाल्मली सुखटणकर यांचा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अत्रे कट्टय़ावर ‘माझे लघुपट’    
ठाणे - ‘आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळा’च्या वतीने बुधवार ७ नाव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आचार्य अत्रे कट्टा, जिजाऊ उद्यान, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे येथे ‘माझे लघुपट’ याविषयावर लेखिका अंजली किर्तने यांची मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. दीपाली केळकर ही मुलाखत घेणार आहेत. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.