शहापूरच्या चेरपोली गावात आढळला मृतदेह Print

शहापूर /वार्ताहर
शहापूरलगतच असलेल्या चेरपोली गावच्या हद्दीतील मालतीविहार अपार्टमेंटच्या पॅसेजमध्ये तुषार ठोंबरे या २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. याबाबत शहापूर स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केल्याचे  पोलीस हवालदार पुंडलिक भोईर यांनी सांगितले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल असे सांगण्यात आले.