श्री अंबिका योग कुटीरतर्फे योग साधकांना प्रमाणपत्रे Print

वसई / प्रतिनिधी
श्री अंबिका योग कुटीर, ठाणे या योग क्षेत्रात काम करणाऱ्या अग्रगण्य संस्थेतर्फे सेंट रॉक्स हायस्कूल गोराई २, बोरिवली (प.) येथे योग वर्गाची सुरुवात ८ जुलै २०१२ पासून सुरू झाली होती. प्रथम त्रमासिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या साधकांचा प्रमाणपत्र सोहळा, ४ नोव्हेंबर २०१२ रोजी कुटिराचे सचिव रामचंद्र सुर्वे व मुंबईचे उपमहापौर मोहन मिठबावकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.   दुसऱ्या त्रमासिक वर्गाचे प्रवेश रविवार, १८ नोव्हेंबर २०१२ रोजी सकाळी ६ वाजता वरील हायस्कूलमध्ये सुरू होतील.