मटणाचे दुकान टाकण्यावरून दोघांवर धारदार शस्त्रांनी वार Print

प्रतिनिधी
मटणाचे दुकान टाकण्यावरून झालेल्या वादात दोन भावांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना पर्वती दर्शन पूरग्रस्त वसाहतीमध्ये घडली. यामध्ये एकाची प्रकृची गंभीर आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
सादीक कुरेशी व आबीद कुरेशी (रा. पूरग्रस्त वसाहत, पर्वती दर्शन) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर हल्ला केल्याच्या आरोपावरून तसदूक अब्दुल रेहमान कुरेशी (वय ३०), त्याची मुले इमरान (वय २१), अफरोज आणि मेव्हणा
फिरोज मेहबूब शेख (रा. सर्वजण- पूरग्रस्त वसाहत, पर्वती दर्शन) यांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे.