‘अभिनव शहरी वित्तीय मॉडेल’ साठी सेंट्रल बँकेचा सन्मान Print

प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या स्कोच संमेलनामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाला ‘अभिनव शहरी वित्तीय समावेशन क्रियान्वयन मॉडेल’ म्हणून सन्मानित करण्यात आले. या शहरी वित्तीय समावेशन मॉडेलची सुरूवात प्रायोगिक तत्त्वावर दिल्ली येथे करण्यात आली असून काही काळाने देशातील सर्व शहरांमध्ये हे मॉडेल कार्यान्वित करण्यात येणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी अजय व्यास, अशोक कुमार, समीर कोचर, नंदन निलेकणी, सुश्री कोचर आदी उपस्थित होते.