साखर कामगारांचे १२ ऑक्टोबरला धरणे आंदोलन Print

प्रतिनिधी
राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळातर्फे १२ ऑक्टोबर रोजी साखर आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
दोन वर्षांपूर्वी राज्यातील साखर जोडधंद्यातील कामगारांचा मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला होता. त्यानुसार त्रिपक्ष समितीचा करार होऊन राज्य सरकारने त्यासंदर्भात शासकीय अध्यादेश काढला होता. परंतु, त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही. तसेच अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांची शासन स्तरावर चर्चा होऊनही निर्णय झाले नाहीत. त्यामुळे राज्यातील साखर आणि जोडधंद्यातील कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.