दिवाकर कारखानीस यांचे निधन Print

पुणे / प्रतिनिधी
दिवाकर ऊर्फ दादा कारखानीस (वय ८३) यांचे अमेरिकेतील ह्य़ूस्टन येथे निधन झाले. ४० वर्षे ते परदेशी होते. भारताची साहित्यिक आणि सांस्कृतिक मूल्य परदेशी जपण्यात ते अग्रेसर होते. पुणे आणि परिसरातील सामाजिक संस्थांना ते आर्थिक मदत करीत असत. ‘सिमरन’ या मराठी पुस्तकाच्या इंग्रजीमध्ये झालेल्या अनुवादाबरोबरच त्यांनी इतरही पाच पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.