आयएसी, सजग, परिवर्तनतर्फे मतदार नोंदणीची मोहीम Print

पुणे / प्रतिनिधी
मतदारांसाठी मतदार नोंदणी सुलभ होण्यासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शन (आयएसी), परिवर्तन आणि सजग नागरिक मंच या संस्थांचे कार्यकर्ते या महिनाभरात मतदार नोंदणीसाठी घराघरात जाऊन नोंदणी करणार आहेत. यासाठी कार्यकर्ते व गृहरचना संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी सुटसुटीत ‘किट’ बनवले असल्याची माहिती आयएसीचे दीपक भराडिया यांनी दिली.
मतदार यादीत नाव येण्यासाठी, मतदार यादीतील नाव दुसऱ्या विभागाच्या यादीत बदल करून घ्यावयाचे असेल तर आपल्या हौसिंग सोसायटीच्या ऑफिसमध्ये मतदार नोंदणीचा फॉर्म-६ आणि आवश्यक ती कागदपत्रे जोडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा फॉर्म भरल्यानंतर तो मतदान केंद्र अधिकाऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी तीनही संस्थांचे कार्यकर्ते लागेल ती मदत करण्यास तयार असतील. हौसिंग सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी पदावरील व्यक्तीस मतदार नोंदणी करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून तयार करण्यात आलेले किटhttp://www.iacpune.in किंवा http://www.parivartan-pune.blogspot.in या संकेतस्थाळावरून डाऊनलोड करता येईल. या संदर्भात काही शंका असल्यास या इमेल आयडीवर This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it किंवा (९३७२८६००२८) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.