बुरुड समाजाच्या मुलांसाठी बांबूच्या वस्तूचे प्रशिक्षण देणारी संस्था सुरू करणार Print

पतंगराव कदम यांची माहिती
 पुणे /प्रतिनिधी
बुरुड समाजाच्या मुलांसाठी अत्याधुनिक पद्धतीने बांबूच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देणारी संस्था सुरू करण्याचे आश्वासन वनमंत्री पतंगराव कदम यांनी दिले आहे. ‘पुणे जिल्हा बुरुड समाजा’ तर्फे सोमवारी कदम यांचा खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कदम बोलत होते.
अभिनेत्री वीणा जामकर, बुरुड समाजाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, आमदार हरीष पिंपळे, ‘पुणे जिल्हा बुरुड समाजा’ चे अध्यक्ष सुनील मोरे यावेळी उपस्थित होते. बांबू वाहतुकीवर शासनाने घातलेले र्निबध उठविण्याबाबत समाजातर्फे कदम यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. कदम यांनी ही मागणी मान्य करून शासकीय अध्यादेश काढल्याने समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.