सुरक्षित वाहन चालविण्याच्या विज्ञान कार्यक्रमाचे आयोजन Print

पुणे / प्रतिनिधी
रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाचा भाग म्हणून ‘यामहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सुरक्षित वाहन चालविण्याच्या विज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे पुण्यातही आयोजन करण्यात आले आहे. प्रामुख्याने मुलांमध्ये लहान वयातच सुरक्षित वाहन चालविण्याचे विज्ञान रुजावे या उद्देशाने खडकी येथे दोन दिवसांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.
शनिवारी या प्रशिक्षण सत्राची सुरुवात करण्यात आली. रविवापर्यंत हे सत्र सुरू राहणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मुलांना रस्ते सुरक्षिततेसंबंधीच्या बाबी व सुरक्षित वाहन कसे चालवावे, याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आठ ते १३ या वयोगटातील अडीचशेहून अधिक मुलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. मागील वर्षी देशातील १३ शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला होता.