मोरया प्रकाशनच्या रौप्यमहोत्सवानिमित्त तीन पुस्तकांचे येत्या रविवारी प्रकाशन Print

प्रतिनिधी
मोरया प्रकाशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त ‘काश्मीर- धुमसते बर्फ’, ‘गोष्टी आपल्या सुख-दु:खाच्या’ आणि ‘कर्म सिद्धांत- सफल जीवनाचा दीपस्तंभ’ अशा तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. केसरीवाडय़ातील लोकमान्य सभागृहात २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
यानिमित्त ३० सप्टेंबपर्यंत मोरया प्रकाशनची सर्व पुस्तके २५ टक्के सवलतीत उपलब्ध होणार आहेत. ‘काश्मीर-धुमसते बर्फ ’ हे पुस्तक माजी राज्यपाल जगमोहन यांच्या ‘माय फ्रोजन ट्रीब्युलन्स इन काश्मीर’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद मो. ग. तपस्वी व सुधीर जोगळेकर यांनी लिहिलेला अनुवाद आहे. ‘गोष्टी आपल्या सुख-दु:खाच्या’ हे पुस्तक पत्रकार कै. चं. प. भिशीकर यांनी लिहिले आहे, तर ‘कर्म सिद्धांत- सफल जीवनाचा दीपस्तंभ’ या पुस्तकाचे लेखक उद्धव कुलकर्णी हे आहेत. या कार्यक्रमास खासदार तरुण विजय हे उपस्थित राहणार आहेत.