बारावीची परीक्षा मराठीतून देण्याचे समर्थ मराठी संस्थेतर्फे आवाहन Print

प्रतिनिधी
शाळेत शिकवण्याचे माध्यम इंग्रजी असले, तरी बारावीची शास्त्र शाखेची परीक्षा मराठीतूनही देता येऊ शकते. विद्यार्थ्यांनी बारावी शास्त्र शाखेची परीक्षा मराठी माध्यमातून द्यावी, असे आवाहन समर्थ मराठी संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
याबाबत समर्थ भारत संस्थेचे अनिल गोरे यांनी सांगितले, ''शास्त्र शाखेची परीक्षा मराठी माध्यामातून देता येऊ शकते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या नियमानुसार शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले, तरी परीक्षा मराठी माध्यमातून देता येते. मराठी भाषेचा कोड ०२ असा आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शास्त्र विषयातील एखाद्या शब्दाला मराठीत प्रतिशब्द माहित नसल्यास, तो शब्द इंग्रजीतून देण्याचीही मुभा देण्यात आली आहे. मराठी भाषेतून परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दर सोमवारी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत समर्थ मराठी संस्थेतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी ९४२२००१६७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.''