‘संपत्ती मिळवण्याच्या प्रयत्नात आध्यात्मिक गरिबी’ Print

पिंपरी / प्रतिनिधी
संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केल्यास आध्यात्मिक गरिबी प्राप्त होते. कोणताही मनुष्य एकाच वेळी देवाची व धनाची चाकरी करू शकत नाही, असे प्रतिपादन पुणे धर्मप्रांताचे बिशप अँड्रय़ू राठोड यांनी केले.
पिंपरी येथील दी युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्ट युवक संघाने आयोजित केलेल्या एकदिवसीय आध्यात्मिक शिबिरात ‘मी तुला स्वर्गाच्या किल्ल्या देईन’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी पालिकेतील विरोधी पक्षनेते कैलास कदम, भाजप नेते अमर साबळे, नगरसेविका मंदाकिनी ठाकरे, अर्जुन ठाकरे आदी उपस्थित होते. पवित्र शास्त्र प्रश्नोत्तर स्पर्धेत चाकण येथील चर्चच्या अपर्णा अंकुटे यांनी तर वैयक्तिक गीतस्पर्धेत दौंड येथील ख्राईस्ट चर्चच्या आशिष वाघमारे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. समूह गीतस्पर्धेत मिरजच्या वानलेसवाडी येथील डिवायन चर्चला प्रथम क्रमांक मिळाला. परीक्षक म्हणून शलाका पारकर, रेव्ह. प्रमोद कालसेकर, डॉ. नितीन साळवी, वैजयंती भालेराव, विनोद सुतार, मनीष रूब्दी, प्रवीण श्रीसुंदर आदी उपस्थित होते. रेव्ह. सुधीर पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सॅम्युअल कांबळे, गौरव चव्हाण, रीचर्ड गजभीव, शीतल धीवर, नोरा साळवी आदींनी संयोजन केले.