पर्याय नसल्यामुळे खासगी कंपनीकडून वीज खरेदी- राजेश टोपे Print

प्रतिनिधी
दुसरा पर्याय नसल्यामुळे खासगी कंपनीकडून वीज खरेदी करण्यात आली असल्याचे ऊर्जा मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. टोपे म्हणाले, ''सध्या राज्यातील वीज निर्मिती प्रकल्पांची कार्यक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे राज्याला आवश्यक असलेला वीज पुरवठा करण्यासाठी खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी करण्यात आली आहे. सध्या राज्यापुढे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. महाराष्ट्रापुढे प्लांट लोड फॅक्टर हे मोठे आव्हान आहे. वीज कमी आहे म्हणून लोडशेडिंग वाढवण्यापेक्षा खासगी कंपनीकडून वीज खरेदी करण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने हेही लक्षात घेण्याची गरज आहे की, राज्य सरकारने नवरात्रीचे नऊ दिवस रात्री भारनियमन पूर्णपणे बंद केले आहे.''