‘स्वरदक्षिणा’ मधून उलगडणार अरूण दाते यांचा सुरेल प्रवास Print

प्रतिनिधी
‘मेक माय ड्रीम फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेने निधी संकलनासाठी ज्येष्ठ गायक अरूण दाते यांचे गायन व गप्पांच्या ‘स्वरदक्षिणा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्रीरंग भावे, प्रज्ञा देशपांडे आणि सई टेंभेकर हे तरूण गायकही कार्यक्रमात गाणी सादर करणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात ३१ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ‘मेक माय ड्रीम’ ही संस्था सध्या १४ अपंग आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी काम करते. या विद्यार्थ्यांसाठी निधी गोळा करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाला पाचशे रुपयांची देणगी प्रवेशिका ठेवण्यात आली आहे. संस्थेतील सर्व अपंग विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्यांना विविध वैद्यकीय उपकरणांची गरज आहे, असेही त्यांनी  सांगितले.