‘दास्ताने रामचंद्र आणि कंपनी’ चे संचालक विश्वास दास्ताने यांचे निधन Print

प्रतिनिधी
पुस्तक प्रकाशक आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे माजी कार्याध्यक्ष विश्वास दास्ताने (वय ६५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे.
‘दास्ताने रामचंद्र आणि कंपनी’ या प्रकाशन संस्थेचे ते संचालक होते. मराठी व इंग्लिशमधील सुमारे ३०० पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. यापूर्वी त्यांनी ‘नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली’चे पश्चिम विभागीय प्रतिनिधी म्हणून काम केले.