४ ते ८ नोव्हेंबर दरम्यान ‘पुलोत्सव’चे आयोजन Print

प्रतिनिधी
पु. ल. देशपांडे यांच्या कारकिर्दीचे पैलू उलगडत, कलेच्या विविध क्षेत्रांतील नावीन्याचा वेध घेणाऱ्या ‘पुलोत्सवा’चे यंदा दहावे वर्ष आहे. या वर्षी ४ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल (रमणबाग) येथे हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती ‘पु.ना. गाडगीळ अँड सन्स’ आणि ‘आशय सांस्कृतिक’ यांच्या वतीने देण्यात आली.
नीलायम चित्रपटगृहाजवळील ‘पाथफाईंडर’ येथे २५ ऑक्टोबरपासून या मोफत प्रवेशिकांचे वाटप सुरू होणार आहे. काही ज्येष्ठ कलावंतांवरील दुर्मिळ लघुपट आणि चित्रपट तसेच काही नवीन लघुपट यंदाच्या पुलोत्सवाचे खास आकर्षण असणार आहेत. याबरोबरच
विविध क्षेत्रांतील कलाकारांशी गप्पा, संगीत मैफली, नाटय़ाविष्कार, पुस्तक प्रकाशने असे कार्यक्रमही या वेळी होणार आहेत. या कार्यक्रमांचे स्वरूप व वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या उत्सवात कलाक्षेत्रातील दिग्गज व्यक्ती, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती व तरूण लोकप्रिय कलाकाराला पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी या वेळी दिली.