उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय वाढावा- राजेश टोपे Print

प्रतिनिधी
‘‘विद्यार्थ्यांना औद्योगिक वातावरणात काम करण्याचा अनुभव मिळावा यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय वाढला पाहिजे,’’ असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. मुलींसाठीच्या ‘मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी (मोशी)’च्या नवीन इमारतीचे मंगळवारी टोपे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेंद्रकुमार श्रीवास्तव, समन्वयक प्रा. शशिकांत ढोले या वेळी उपस्थित होते. टोपे म्हणाले, ‘‘औषधनिर्मिती (फार्मसी) शाखेचे विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करणे किंवा प्राध्यापकी पेशा स्वीकारणे पसंत करतात. मात्र या विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळायला हवे.