वाहनांच्या सुटय़ा भागांच्या प्रदर्शनाची सुरुवात Print

चिंचवड येथे २१ ऑक्टोबपर्यंत खुले
पिंपरी / प्रतिनिधी
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि आयटीपीओ यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे वाहनांच्या सुटय़ा भागांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून गुरुवारी त्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. येत्या २१ ऑक्टोबपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
चिंचवडच्या ऑटो क्लस्टर येथे मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष एस. के. जैन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘फोरेशिया’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी एड्रीयन विलीयम्स, सनदी अधिकारी बी. एल. मीना, यावेळी अनंत सरदेशमुख, जे. के. सराफ, वाय. के. शर्मा आदी उपस्थित होते. याशिवाय गुजरात व तामिळनाडू येथील कंपन्यांचे प्रतिनिधी आवर्जून हजर होते. या प्रदर्शनात मोठय़ा संख्येने कंपन्यांनी सहभाग घेतला असून केंद्राच्या अवजड उद्योग विभागाने भरीव सहकार्य केले आहे. २१ ऑक्टोबपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार
आहे.