घरातील टबमध्ये चिमुरडीचा मृत्यू Print

पुणे / प्रतिनिधी
निगडी येथील यमुनानगर येथे घरात खेळत असताना चौदा महिन्याची चिमुरडी टबमध्ये पडून तिचा मृत्यू झाला. वाणीकुमारी नितेश कुमार (वय- चौदा महिने, रा. यमुनानगर, निगडी) असे त्या चिमुरडीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाणीकुमारीची आई घरकामात असताना ती घरात खेळत-खेळत बाथरूममधील पाण्याने भरलेल्या टबमध्ये जाऊन पडली. घरात वाणीकुमारी न दिसल्यामुळे तिच्या आईने शोधाशोध केली असता ती टबमध्ये पडलेली दिसली. तिला तत्काळ बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.