सारंग गोसावी यांना युथ क्रांती पुरस्कार Print

पुणे / प्रतिनिधी
समाजात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या युवकांना इंदिरा ग्रुप च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘युथ क्रांती अ‍ॅवॉर्ड्स’ ची नुकतीच घोषणा करण्यात आली.
या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून पाच युवकांची निवड करण्यात आली असून यात पुण्याच्या सारंग गोसावी या युवकाचाही समावेश आहे. सव्वा लाख रुपयांची शिष्यवृत्ती आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
असीम फाउंडेशनच्या माध्यमातून काश्मीरमधील विविध समस्यांवर सारंग गोसावी काम करीत आहेत. गोसावी यांच्याबरोबरच अरुणाचल प्रदेशच्या अलकागौरी जोशी, बीडमधील संतोष गर्जे, अहमदनगर येथील अजित कुलकर्णी आणि गुडगावचे नवीन गुलिया यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती इंदिरा ग्रुपच्या संस्थापिका व अध्यक्षा डॉ.तरिता शंकर यांनी दिली. सामाजिक कार्यकर्त्यां नीलिमा मिश्रा यांच्या हस्ते येत्या ३ नोव्हेबर रोजी बालगंधर्व
रंगमंदिर येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.