‘आयबीएम’ च्या रोजगार मेळाव्यास चांगला प्रतिसाद Print

पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने ‘आयबीएम’ कंपनीतर्फे आयोजित रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २० व २१ ऑक्टोबरला निगडीत झालेल्या या मेळाव्यासाठी देशभरातून ४५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातून ४५० जणांची निवड करण्यात आली. त्यापैकी १५० तरूणांना रोजगार मिळेल, असा विश्वास संयोजक प्रा. शीतलकुमार रवंदळे यांनी दिला. मेळाव्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव विठ्ठल काळभोर, प्रा. डॉ. अ. म. फुलंबरकर यांनी मार्गदर्शन केले.