‘विघ्नहर’च्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन Print

९० कोटी रु पये खर्चातून प्रकल्पाची निर्मिती
पुणे / प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने ९० कोटी रु पये खर्चातून उभारलेल्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते २४ ऑक्टोबरला होणार आहे. कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभदेखील या वेळी होणार आहे.
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सोपानशेठ शेरकर यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमासाठी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार वल्लभ बेनके आदी उपस्थित राहणार आहेत. साखर कारखान्याच्या माध्यमातून विघ्नहरने सहवीज निर्मितीसाठी २००६ मध्ये ६ मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प राज्यात सर्वप्रथम सुरु  केला होता. विघ्नहरने राबवलेल्या इतर सहउत्पादन प्रकल्पामुळे शेतकरी सभासदांना चांगला भाव देणे विघ्नहरला शक्य झाले आहे. यंदा कारखान्याकडून ८ लाख टन उसाचे गाळप केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.