‘गपशप सेवा’ विजयादशमी पासून Print

प्रतिनिधी
कोणत्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली, अपघात किंवा मिरवणुकीमुळे कोणता रस्ता बंद आहे, अशी वाहतूकविषयक माहिती देणारी ‘एसएमएस गपशप सेवा’ विजयादशमीपासून सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत सध्या सहा हजार ग्राहक सहभागी झाले आहेत. शहर वाहतूक शाखेकडून ही सेवा विनामूल्य दिली जाणार आहे. या सेवेमध्ये नागरिकांना वाहतूकविषयक जनजागृती संदेशही दिले जाणार आहेत. शहरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा विनामूल्य घेऊ शकणार आहे. त्यासाठी  खडकठ खळढ असा एसएमएस ९२१९५९२१९५ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्याचबरोबर ही सेवा नको असेल तेव्हाबंदही करता येईल.