धनकवडी इमारत दुर्घटनेतील पीडीतांना मदत Print

प्रतिनिधी
धनकवडी येथील इमारत दुर्घटनेतील दोन पीडित कुटुंबांना सहकारनगर पोलीस ठाण्यात शिवरत्न प्रतिष्ठान आणि कानिफनाथ तरुण मित्रमंडळाच्या वतीने गॅस कनेक्शन देण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त वसंत सोनावणे यांच्या हस्ते या कुटुंबीयांना नवीन गॅस कनेक्शन, शेगडी देण्यात आली. या वेळी पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, राजेंद्र तोडकर, शिवरत्न प्रतिष्ठानचे सचिन बाविस्कर, कानिफनाथ तरुण मित्रमंडळाचे सागर भागवत या वेळी उपस्थित होते.