‘युवक व आर्थिक शक्ती या देशाच्या विकासाच्या प्रेरणा’ Print

पुणे / प्रतिनिधी
युवक व आर्थिक शक्ती या देशाच्या विकासाच्या प्रमुख प्रेरणा आहे. परंतु युवकांना केवळ संधीअभावी नैराश्य आल्यास देशाचे सामाजिक स्वास्थ्य ढासळेल, असे मत रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाच्या कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, बँकिंगच्या प्राचार्या मीना हेमचंद्रा यांनी व्यक्त केले. विजया बँकेच्या ८२ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘युवकांचे सशक्तीकरण व आर्थिक संस्थांची कार्ये’ या विषयावर त्या बोलत होत्या.यावेळी विजया बँकेच्या विभागीय कार्यालयाचे उपसरव्यवस्थापक रमेशकुमार मिगलानी उपस्थित होते.