सांगवीत आदर्श माता व ज्येष्ठांचे सत्कार Print

पिंपरी / प्रतिनिधी
आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कर्तृत्वाची दखल घेऊन झालेल्या सत्कारामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. निमित्त होते सांगवीतील आदर्श माता व ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराचे.सांगवीतील ढोरेनगर मित्र मंडळाच्या वतीने पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक व आदर्श मातांचा सत्कार करण्यात आला. अहल्यादेवी होळकर विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास माजी महापौर नानासाहेब शितोळे, नगरसेवक प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, सुषमा तनपुरे, शैलजा शितोळे, वैशाली जवळकर, शरद ढोरे, सचिन इंगुळकर, शांताराम जाधव, मंडळाचे अध्यक्ष गणेश ढोरे आदी उपस्थित होते. प्रास्तविक कुमार ढोरे यांनी केले. आभार विजय साने यांनी मानले. सूत्रसंचालन गौरी व युवराज गायकवाड यांनी केले.