राजगुरूनगर तालुक्यात कोल्हा जखमी अवस्थेत आढळला Print

पुणे / प्रतिनिधी
खेड-राजगुरूनगर तालुक्यातील चासकमान धरण परिसरातील डोंगरदऱ्यातील साबुर्डी येथे जखमी अवस्थेत असणाऱ्या कोल्हय़ाला ग्रामस्थ आणि शिक्षकांनी वन विभागाच्या ताब्यात दिले.
साबुर्डी (ता. खेड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात जखमी अवस्थेत असलेला कोल्हा शिक्षकांना दिसला. याची माहिती ग्रामस्थांना दिल्यानंतर जखमी कोल्हय़ाला वर्गात आणण्यात आले त्याची खबर राजगुरुनगर येथे वन खात्याला देण्यात आली. वन विभागाच्या वतीने वनरक्षक ए. एस. फलके, वनरक्षक एन. एम. आरुडे, एम. एस. गायकवाड, वनपाल रामगुडे, वनमजूर बी. एस. भंडारी आदींनी घटनास्थळी जाऊन जखमी कोल्हय़ाला राजगुरुनगर येथे आणून उपचार केले. वनपरिक्षेत्र अधिकारी जी. के. पाटील यांनी त्वरित उपचार करण्यासाठी दखल घेतली. कोल्हय़ावर तरसाने हल्ला केला असल्याने पाठीवर जखमा झाल्या आहेत. अडीच वर्ष वयाचा असणारा कोल्हा उंचीने दोन फूट लांबीचा आणि तीन फूट आहे.