सराईत गुन्हेगार केदारीला दुसऱ्या गुन्हय़ात अटक Print

पुणे / प्रतिनिधी
गेल्या महिन्यात कोथरूड येथे वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी अटक केलेला सराईत गुन्हेगार राम बाळू केदारी (वय २३, रा. भवानीनगर, कोथरूड) याला व त्याच्या तीन साथीदारांना एका व्यक्तीच्या घरात घुसून हल्ला केल्याच्या गुन्हय़ात अटक केली आहे.
न्यायालयाने त्यांना २५ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याबाबत बाळू सुधाकर परदेशी यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून केदारीसह अक्षय सदाशिव काळोखे (वय १९, रा. कोथरूड), दीपक ऊर्फ पप्पू तानाजी झुंजुरके (वय २१, रा. जयभवानीनगर) आणि राम मारुती कदम (वय २३, रा. किष्किंदानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून २०१२ रोजी आरोपींनी परदेशी यांच्या घरात घुसून मारहाण केली होती.  त्या वेळी त्यांना मदत करण्यासाठी आलेल्या आणखी एका व्यक्तीला मारहाण केली होती. याप्रकरणी सहाजणांवर खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, दंगल या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.