फसवणूक झालेल्यांनी तक्रार करावी:दाभोलकर Print

पुणे / प्रतिनिधी
मंत्राने सिद्ध केलेली रुद्राक्षाची माळ देऊन मानसिक आजार बरा करण्याबरोबरच संकट निवारणाचा दावा करणाऱ्या त्याचप्रमाणे चेटूक, काळी जादू यांसारख्या प्रकारांमध्ये आर्थिक फसवणूक झालेल्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मंगळवारी केले. फसवणूक झालेल्यांनी पोलिसांकडे तक्रार केली तर, समाजाचे डोळे उघडण्यास चालना मिळेल, असेही ते म्हणाले. अशाच एका प्रकरणात फसवणूक झालेल्या युवतीने अंनिसचे सचिव मिलिंद देशमुख यांच्या मदतीने फिर्याद दाखल केल्यामुळे खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
या पाश्र्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी हे आवाहन केले. फसवणूक झालेली युवती याप्रसंगी उपस्थित होती.