संक्षिप्त Print

साहित्यसम्राट न.चिं.केळकर पुरस्कार जाहीर
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे देण्यात येणारे यावर्षीचे ‘साहित्यसम्राट न.चिं.केळकर पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे, आसावरी काकडे, डॉ.मीना प्रभू, श्रीनिवास भणगे आणि अजय शहा यांना जाहीर झाले आहेत. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पुणे मराठी ग्रंथालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
डॉ.अच्युत गोडबोले आत्मचरित्राचे प्रकाशन
सुप्रसिद्ध लेखक डॉ.अच्युत गोडबोले यांच्या ‘मुसाफिर’ या आत्मचरित्राचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार व लेखक अरुण साधू यांच्या हस्ते होणार आहे. मनोविकास प्रकाशनने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. येत्या २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता भारत इतिहास संशोधक मंडळ येथे हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे.
‘पॉप्युलर’तर्फे पुस्तक प्रदर्शन
‘पॉप्युलर बुक हाऊस’तर्फे पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकांची २० टक्के सवलतीत तसेच ‘सीडी-व्हिसीडीं’ची १० टक्के सवलतीत विक्री केली जाणार आहे. डेक्कन जिमखान्यावरील ‘पॉप्युलर बुक हाऊस’च्या दुकानात आयोजित हे प्रदर्शन सोमवारसोडून आठवडाभर सुरू राहणार आहे.