अंशत: रद्द लोकल पुन्हा सुरू Print

प्रतिनिधी
लोहमार्गाची दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी चिंचवड ते पुणे या स्थानकादरम्यान अंशत: रद्द करण्यात आलेल्या लोणावळा लोकल बुधवारी सुरू करण्यात आली.
पुणे-लोणावळा ही पुण्याहून दुपारी तीन वाजता सुटणारी व लोणावळा-पुणे ही दुपारी दोन वाजता लोणावळय़ाहून सुटणाऱ्या लोकलचा त्यात समावेश आहे. दापोडी ते िपपरी दरम्यान १८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी या दोन लोकल अंशत: रद्द करण्यात आल्या होत्या.