किशोरच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन Print

प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे मुलांना अवांतर वाचनाची गोडी लावणाऱ्या किशोरच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले असून किशोर मधून प्रकाशित होणारे साहित्य अधिक सकस व दर्जेदार व्हावे, यासाठी किशोरसाठी लिहिणाऱ्या लेखक व कवींना पुढील वर्षांपासून वाढीव मानधन देण्याची घोषणा यावेळी दर्डा यांनी केली.
या वर्षी किशोरमध्ये लक्ष्मीनारायण बोल्ली, प्रवीण दवणे, श्रीनिवास गडकरी, विजया जहागिरदार, डॉ. बाळ फोंडके, डॉ. न. म. जोशी, आनंद देशमुख या लेखकांनी लिहिले आहे. किशोर दिवाळी अंकाच्या प्रकाशनाबरोबरच मंडळाने प्रकाशित केलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज स्मृतिग्रंथाचे आणि मंडळामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या स्वसंरक्षण या पुस्तकाचे प्रकाशन शालेय राज्यमंत्री    फौजिया खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालभारतीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.