मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर Print

प्रतिनिधी
मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वतीने ईदनिमित्त नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी बकरी ईद निमित्त प्रार्थना व कुर्बानीचे आयोजन करण्यात केले जाते. मात्र बऱ्याचदा परस्पर गैरसमजातून कटूताही निर्माण होऊ शकते. म्हणूनच सर्व धर्माच्या व्यक्तींमध्ये शांतता व सद्भावना वाढीस लागावी यासाठी यावर्षी मुस्लीम बांधवांबरोबरच विविध धर्माच्या बांधवांच्या उपस्थितीत हे रक्तदान शिबिर राबविण्यात आले. या प्रसंगी शमसुद्दीन तांबोळी, नरेंद्र दाभोलकर, बाबा आढाव, सय्यदभाई उपस्थित होते.