देशातील ३६ टक्के विद्यापीठे ग्रामीण भागात Print

प्रतिनिधी
देशात २०१०-११ या शैक्षणिक वर्षांमध्ये उच्च शिक्षणाचा ‘ग्रॉस एन्रोलमेंट रेशो’ १८.८ अपेक्षित असून सध्या देशातील ३६ टक्के विद्यापीठे ही ग्रामीण भागामध्ये असल्याचे ऑल इंडिया सव्‍‌र्हे ऑफ हायर एज्युकेशनने केलेल्या सर्वेक्षणाच्या कच्च्या अहवालामध्ये म्हटले आहे. दरवर्षी ऑल इंडिया सव्‍‌र्हे ऑफ हायर एज्युकेशनतर्फे देशातील उच्च शिक्षणाच्या परिस्थितीचे सर्वेक्षण केले जाते. सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी आपली माहिती ‘ऑल इंडिया सव्‍‌र्हे ऑफ हायर एज्युकेशन’ च्या संकेतस्थळावर दिलेल्या अर्जामध्ये भरायची असते. या सर्वेक्षणाचे अर्ज भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये ऑगस्टपर्यंत जमा झालेल्या माहितीनुसार देशातील ३६ टक्के विद्यापीठे, ४८ टक्के महाविद्यालये आणि ५६ टक्के स्वायत्त शिक्षण संस्था या ग्रामीण भागात कार्यरत आहेत. एकूण महाविद्यालयांपैकी ५७ टक्के महाविद्यालये आणि ६४ टक्के स्वायत्त संस्था खासगी, विनाअनुदानित आहेत. फक्त महिलांसाठी असलेल्या महाविद्यालयांचे प्रमाण ९ टक्के, तर विद्यापीठांचे प्रमाण १ टक्का आहे.