लोणावळय़ाच्या दोन लोकल आजपासून पुन्हा अंशत: रद्द Print

प्रतिनिधी
लोहमार्गाच्या देखभाल व दुरुस्तीचे काम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने पुणे- लोणावळा दरम्यान धावणाऱ्या दोन लोकल २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत चिंचवड ते पुणे या स्थानकादरम्यान अंशत: रद्द करण्यात येणार आहेत, असे मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
मागील एक महिन्यापासून लोहमार्गाची दुरुस्ती व देखभालीचे काम अत्याधुनिक यंत्रणेमार्फत केले जात आहे. हे काम वेगवेगळय़ा टप्प्यांमध्ये सुरू आहे. शनिवारपासून िपपरी ते दापोडी या पट्टय़ातील काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन लोकल केवळ चिंचवडपर्यंत येतील व तेथूनच लोणावळय़ासाठी रवाना होतील. लोणावळय़ाहून दुपारी दोन वाजता पुण्यासाठी सुटणारी लोकल पुण्यापर्यंत न येता चिंचवडपर्यंतच धावेल. त्याचप्रमाणे पुण्याहून दुपारी दोन वाजता सुटणारी लोकल चिंचवडहून सोडण्यात येईल.
ही लोकल पुणे ते चिंचवडदरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.