क्षेत्रीय सैन्यभरती उस्मानाबाद येथे २ ते ९ नोव्हेंबर दरम्यान होणार Print

प्रतिनिधी
क्षेत्रीय सैन्य भरती कार्यालयातर्फे येत्या २ ते ९ नोव्हेंबर दरम्यान उस्मानाबाद येथील पोलीस परेड मैदानावर खुला भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पुणे, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्य़ांतील पात्र उमेदवारांसाठी हा मेळावा असून याविषयी अधिक माहितीसाठी (०२०-२६३४५००५) या क्रमांकावर अथवा जिल्हा सैनिक कल्याण मंडळाकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लातूरच्या उमेदवारांची भरती २ नोव्हेंबर रोजी, तर अहमदनगर जिल्ह्य़ातील विविध तालक्यांसाठीची भरती ३ व ४ नोव्हेंबरला होणार आहे. वीड जिल्ह्य़ातील भरती ५ व ६ नोव्हेंबर रोजी, तर पुणे जिल्ह्य़ातील उमेदवारांची भरती ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ासाठी ८ व ९ नोव्हेंबर हे दिवस आहेत. या पाचही जिल्ह्य़ातील राष्ट्रीय छात्रसेना प्रमाणपत्रधारक, खेळ प्रमाणपत्रधारक, माजी सैनिकांची मुले यांची भरती ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह त्या-त्या तारखांना उस्मानाबाद येथील परेड मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.