‘हा खटाटोप कोणत्या बिल्डरांसाठी? Print

प्रतिनिधी
पुणे शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखडय़ात अनेक धक्कादायक बदल करण्यात आल्याचा आरोप करून कोणत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे, असा प्रश्न पुणे जनहित आघाडीने शहर सुधारणा समितीला जाहीरपणे विचारला आहे.
विकास आराखडय़ातील विविध प्रस्ताव, तसेच आराखडय़ाला देण्यात आलेल्या उपसूचना आणि विकास
नियंत्रण नियमावलीत होऊ घातलेले बदल धक्कादायक आहेत.
संपूर्ण आराखडय़ात नदीच्या कडेने कोठेही पूररेषा दाखवण्यात आलेली नाही. तसेच पूररेषा आणि धोकादायक रेषा यांचीही आखणी आराखडय़ात केलेली नाही.
त्यातही पूररेषेत येणाऱ्या जागेवर बांधकामांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अशी परवानगी देण्याचे कारण काय, असा प्रश्न जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.