लेखिका डॉ. शकुंतला लाटकर यांचे निधन Print

पुणे / प्रतिनिधी
आदर्श शिक्षण मंडळाच्या बी.एड. कॉलेजच्या माजी प्राचार्य व लेखिका डॉ. शकुंतला लाटकर (वय ८७) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या मराठी व इंग्रजी भाषेतील उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्ध होत्या. दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय ‘महाभारत’ या मालिकेच्या ९३ भागांचा मराठीमध्ये त्यांनी अनुवाद केला होता. विनोदी लेखक दिवंगत गो.गं.लिमये यांच्या त्या कन्या, तर प्रसिद्ध ग्रंथमुद्रक चिंतामणी लाटकर यांच्या त्या पत्नी होत्या.