नेत्रदान जनजागृती मोहीम पुणे जिल्ह्य़ात संपन्न Print

पुणे / प्रतिनिधी
नेत्रदानाविषयी जनजागृती होण्यासाठी ‘विराग आर्टिस्ट ट्रस्ट’ आणि प्रा. प्रकाश दळवी यांच्या पथकाद्वारे पुणे जिल्ह्य़ातील बारा तालुक्यांमध्ये ‘नेत्रदान जनजागृती मोहीम’ व चित्रकला स्पर्धा राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये २५०० व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला. ‘नेत्रदान श्रेष्ठदान’ या विषयावर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत १४०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. संपूर्ण पंधरा दिवस चाललेल्या या मोहिमेचे मार्गदर्शन प्रा. प्रकाश दळवी आणि विवेक मेंडोंसा यांनी केले.
पुणे जिल्हय़ातील बारा तालुक्यांमधील आरोग्य अधिकारी-मदतनीस, अंगणवाडी मदतनीस-सेविका, यांच्यासाठी माहिती पत्रके, संगीत, गायन, पोवाडे, व्याख्याने याद्वारे जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा आरोग्य विभाग व ‘लॉरेन्स अॅन्ड मायो’ यांनी मदत केली.