खोटय़ा तक्रारीद्वारे चारित्र्यहननाचा प्रयत्न Print

आमदार निम्हण यांचा दावा
पिंपरी / प्रतिनिधी
बाणेर येथील जमिनीसंदर्भात काही नागरिकांनी खोटय़ा तक्रारी करून माझे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा आमदार विनायक निम्हण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांचे चिरंजीव नगरसेवक सनी निम्हण उपस्थित होते. विनायक निम्हण म्हणाले की, आपल्याविरोधात खोटी तक्रार दाखल केल्यामुळे पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला. मात्र, तक्रार करणाऱ्यांनीच कागदपत्रे अपुरी आणि अयोग्य दिली असल्याचे महापालिकेने दिलेल्या कागदपत्रांवरून उघड झाले आहे. आपली प्रदीर्घ सामाजिक जीवनात आमदार म्हणून काम करताना शुद्ध चारित्र्याबद्दल आपण सदैव जागरूक आहोत. स्वतची प्रतिमा डागाळली जाईल, असे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडले नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. आपल्या पक्षात एखादी विरोधात बातमी प्रसिद्ध झाली तरी त्याची कात्रणे फॅक्स तसेच ई-मेलद्वारे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली जातात, असेही निम्हण यांनी सांगितले.