हडपसरसह काही भागात आज पाणीपुरवठा बंद Print

प्रतिनिधी
लष्कर जलकेंद्रांतर्गत हडपसर भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवितरण नलिकेच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी (३० ऑक्टोबर) केले जाणार असल्यामुळे हडपसरसह काही भागांचा पाणीपुरवठा मंगळवारी दिवसभर बंद राहणार आहे. या सर्व भागांना बुधवारी (३१ ऑक्टोबर) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत. संपूर्ण हडपसर गाव, म्हेत्रे मळा, वेताळबाबा वसाहत, ससाणेनगर, तुळजाभवानी वसाहत, काळेबोराटेनगर, सय्यदनगर गल्ली क्र. १ ते १४, माळवाडी, भागीरथीनगर, गाडीतळ, आकाशवाणी १५ नंबर कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, पारिजात सोसायटी, मगरपट्टा रस्ता डावी व उजवी बाजू, वैदूवाडी, रामटेकडी, मिलिंदनगर, भीमनगर, शिंदे वस्ती आणि हडपसर औद्योगिक वसाहत.
काही भागात गुरुवारी पाणी बंद
बंडगार्डन पाणीपुरवठा अंतर्गत ठाकरसी टाक्यांच्या गळती व दुरुस्तीचे काम गुरुवारी (१ नोव्हेंबर) केले जाणार असल्यामुळे गुरुवारी पुढील भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागपूर चाळ, कल्याणीनगर, संगमवाडी, येरवडा, फुलेनगर, प्रतीकनगर, विश्रांतवाडी आणि वडगावशेरी परिसर. या भागांना शुक्रवारी (२ नोव्हेंबर) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.