‘निवारा’ संस्थेस ‘समर्पण पुरस्कार’ प्रदान Print

प्रतिनिधी
एल. टी. मारणे मेमोरियल फाउंडेशनतर्फे माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांच्या हस्ते निवारा संस्थेस लक्ष्मणराव तुकाराम मारणे स्मृती समर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या विश्वस्त निर्मला सोवनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ज्येष्ठ पत्रकार अरिवद व्यं. गोखले आणि फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा लोणकर या प्रसंगी उपस्थित होत्या. निर्मला सोवनी म्हणाल्या, ३५ वर्षांपूर्वी संस्था चालविताना येणाऱ्या समस्या समाजानेच कमी केल्या आहेत. लोक भरभरून देणगी देतात. त्यामुळे आम्ही येथील वृद्धांची योग्य काळजी घेऊ शकतो. स्नेहा लोणकर यांनी प्रास्ताविक केले. माधुरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.