डीटीएड अभ्यासक्रमही आता दूरशिक्षणामार्फत Print

प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने (एमएससीआरटी) शिक्षकांसाठी चालवला जाणारा पदविका अभ्यासक्रम (डीटीएड) अधिक शिक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी या अभ्यासक्रमासाठी दूरशिक्षणाचा
पर्यायही एमएससीआरटीने उपलब्ध करून दिला आहे. या अभ्यासक्रमानुसार डीटीएड अभ्यासक्रमाचे साहित्य टपालामार्फत पाठवण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाचे माहितीपत्रक जिल्हा परिषदेमध्ये ५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीमध्ये उपलब्ध
आहे.  इच्छुकांनी १९ नोव्हेंबपर्यंत या अभ्यासक्रमासाठी मुख्याध्यापकांच्या सहीसह भरून द्यायचा आहे. याबाबत एमएससीआरटीचे संचालक डॉ. एन. के. जरग म्हणाले, ‘‘शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींची पूर्तता करण्यासाठी मार्च २०१३ मुदत देण्यात आली आहे. मात्र काही कारणास्तव अनेक शिक्षक विविध प्रशिक्षण कार्यक्रमांना हजेरी लावू शकत नाहीत. या शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा दूरशिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.’’