शहराच्या पाणीप्रश्नावर उद्या चर्चासत्राचे आयोजन Print

प्रतिनिधी
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९५ टक्के पाणीसाठा होऊनही शहरात पाणीकपात का, असा प्रश्न पुणेकरांना पडला असून या प्रश्नाबाबत रविवारी (४ नोव्हेंबर) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सजग नागरिक मंचतर्फे बीएमसीसी रस्त्यावरील आयएमडीआरए संस्थेच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता हे चर्चासत्र होईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि जुगल राठी यांनी दिली. पुणे शहरातील पाणीकपात हा चर्चासत्राचा मुख्य विषय असून आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, माधुरी मिसाळ, विनायक निम्हण, बापू पठारे तसेच महापालिकेतील विरोधी पक्षनेता वसंत मोरे या चर्चासत्रात उपस्थित राहणार आहेत. सर्वासाठी हे चर्चासत्र खुले असल्याचेही सांगण्यात आले.